भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्याच्या गाडीला उत्तर प्रदेशातील गोंडा येथील कर्नलगंज हुजूरपूर रोडवरील बैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ भीषण अपघात झाला आहे. फॉर्च्युनर कारने 3 मुलांना चिरडले आहे. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण भूषण यांच्या ताफ्यातील गाडीने हा अपघात झाला असून या ताफ्यात करण होते की नाही याचा तपास लावला जात आहे.करण भूषण यांचे नाव तक्रारीत नाही. कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉर्च्युनर कार आणि तिच्या चालकाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई करत आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सामान्य आहे.