बिहारच्या सुपौलमध्ये पाच जणांच्या सामूहिक आत्महत्येची घटना समोर आली आहेत. राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गद्दी गावात एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह घराच्या आत लटकलेल्या अवस्थेत आढळले. आजूबाजूच्या लोकांनी घराबाहेर दुर्गंधीची तक्रार केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. घरातून ताब्यात घेतलेले 5 मृतदेह मिश्रीलाल साह, त्यांची पत्नी, 2 मुली आणि एक मुलगा अशी ओळखण्यात आली आहे. या घटनेमागील आर्थिक तंगी आणि कर्जाची गोष्ट समोर आली आहे. सामूहिक आत्महत्येने लोकांना हादरवून टाकले.