रामनाथ कोविंद राष्ट्रपती पदाचे उमेदवार - अमित शहा

भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद एनडीएकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार असतील. उपराष्ट्रपती पदासाठी अजून कोणत्याही नावावर निर्णय घेण्यात आलेला नाहीत.
 
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांच्या नावाची घोषणा करत म्हटले की सर्व दलांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी या संबंधात सोनिया गांधीसह इतर विपक्ष नेत्यांशी चर्चा केल्याचेही सांगितले.
 
यापूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवार केल्या जाण्याची चर्चा रंगत होती. पण या घोषणेमुळे अडवाणी पुन्हा एकदा प्रेसिडेंट इन वेटिंग बनले. तसेच कोविंद दलित समुदायाचे असून निर्विवाद असल्याचा त्यांना फायदा मिळाले दिसून येत आहे.

वेबदुनिया वर वाचा