बिहारच्या नालंदामधून मोठी बातमी समोर येत आहे. सिलाओ येथील गांधी हायस्कूलमध्ये कार्यक्रमादरम्यान स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्यापासून काही अंतरावर हा स्फोट झाला. सुदैवाने मुख्यमंत्री नितीश यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट काही छोट्या फटाक्यांमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. वास्तविक, आदल्या दिवशी मुख्यमंत्री नितीश पहिल्यांदा पावापुरीला गेले होते. तेथून सिलाओमार्गे राजगीरला जावे लागते. यावेळी ते सिलाव येथील गांधी हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमात पोहोचले होते, तिथे ही घटना घडली.