भूपेंद्र पटेल होणार दुस-यांदा गुजरातचे मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण कोण बनू शकते मंत्री

सोमवार, 12 डिसेंबर 2022 (09:48 IST)
गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवून भाजप पुन्हा सत्तेत आला आहे. भूपेंद्र पटेल सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री होणार असून ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यात काही नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
 
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गांधीनगर येथील हेलिपॅड मैदानावर आज दुपारी दोन वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळावर पक्षात खोलवर चर्चा होत आहे. कोणाला मंत्री केले जाणार आणि कोणाला नाही यावर मंथन सुरू आहे. ज्यांना मंत्री केले जाणार आहेत, त्यांना फोनवरून माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे आणि कोणाला नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक नावे आहेत जी पहिल्यांदाच मंत्री होणार आहेत.
 
संभाव्य मंत्र्यांची यादी
ऋषिकेश पटेल, कनु देसाई पारडी, राघवजी, बळवंत राजपूत, कुंवरजी बावलिया, विजय रुपाणी, मूलू बेरा, जगदीश पांचाळ, भानू बेन बाबरिया, बच्चू खबर, कुबेर दिंडोर, परसोत्तम सोलंकी, भिखू भाई परमार, कुंवरजी हरपती, प्रफुल्ल, देवलाल, मा. मुकेश पटेल आणि हर्ष संघवी.
Edited by : Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती