भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना प्रत्येकी ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

शनिवार, 29 जानेवारी 2022 (08:33 IST)
बहुचर्चित आध्यामिक गुरु भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात महाराजांचे सेवेकरी विनायक, पलक आणि शरद यांना न्यायालयाने दोषी म्हटले आहे. या तिघांनी महाराजांना पैशांसाठी वारंवार ब्लॅकमेल केले. त्यामुळेच महाराजांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. त्यामुळे या तिघांनाही प्रत्येकी ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
अध्यात्मिक संत म्हणून ओळखले जाणारे भैय्यू महाराज यांनी दि. १२ जून २०१८ रोजी राहत्या घरी आपल्याच कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. महाराजांचे तीन सेवक पलक पुराणिक, विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांनी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली घटनेच्या सुमारे सहा महिन्यांनंतर, पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून हे तिन्ही आरोपी तुरुंगात आहेत. आरोपी पलकच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता अविनाश सिरपूरकर, आरोपी शरदच्या वतीने अधिवक्ता धर्मेंद्र गुर्जर यांनी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. आरोपी विनायकच्या वतीने अधिवक्ता आशिष चौरे आणि इम्रान कुरेशी यांनी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. त्याला बळजबरीने या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे आरोपीच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले. पण, त्यात तथ्य नव्हते.
 
भैय्यू महाराजांनी विनायकवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. तरीही त्याने असे का केले, असा प्रश्न अनेकांना पडला. तिघांनीही महाराजांचा मोठा छळ केला, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती