गेल्या महिन्यात देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्यापासून नवीन सीडीएसच्या नियुक्तीबाबत विचार केला जात होता. मात्र दीड महिना उलटून गेला तरी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. लष्करप्रमुख नरवणे यांचा कार्यकाळ 30 एप्रिलपर्यंत आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सरकार त्यांची पुढील सीडीएस म्हणून नियुक्ती करू शकते. नरवणे हे सध्या सर्वात वरिष्ठ जनरल आहेत आणि ते तिन्ही सेवांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्षही आहेत.
सूत्रांचे म्हणणे आहे की सेवारत जनरल आणि त्याच्या समकक्ष अधिकाऱ्याची सीडीएस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. ज्यामध्ये नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख येतात. परंतु जनरल पदावर पदोन्नती मिळण्याची पूर्ण क्षमता असलेल्या लेफ्टनंट जनरलची देखील सीडीएस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. म्हणजेच सरकारकडे आजही अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र आजतागायत एकही पर्याय वापरला गेला नाही. त्यामुळे जनरल नरवणे यांची नियुक्ती होण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे.