मान्सूनची योग्य वाटचाल सुरु, पुणे वेधशाळेचा अंदाज

मंगळवार, 23 मे 2017 (11:50 IST)

आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. 

विदर्भात तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून येत्या २४ मेपर्यंत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. येत्या २५ मे रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून २६ मे रोजी दक्षिण कोकण- गोवा, दक्षिण मध्य- महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात येत्या २६ मेपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर, २७ मे रोजी दुपारनंतर गडगडाटी ढग तयार होण्याची शक्यता असून २८ मे रोजी काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

वेबदुनिया वर वाचा