बांग्लादेश पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर

शनिवार, 8 एप्रिल 2017 (14:53 IST)

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशातील संबंध दृढ करणं आणि परस्पर गुंतवणूक तसंच व्यापार सहकार्य यावर चर्चा केली जाणार आहे. पश्चिम बंगालमधून वाहणाऱ्या तिस्ता नदीच्या पाणीवाटपाविषयी दोन्ही देशांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिस्ता नदीच्या पाणीवाटप कराराचा प्रश्न गेली 50 वर्षे प्रलंबित आहे. या नदीचं पाणी पश्चिम बंगालला देण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा विरोध आहे. मात्र बांग्लादेशचा विरोधी पक्ष या पाण्याबाबत आग्रही असल्यामुळे शेख हसीनांवर मोठा दबाव आहे.

वेबदुनिया वर वाचा