तपासणीत असे आढळून आले की हॉस्पिटलची एनओसी 31 मार्च रोजी संपली होती आणि हॉस्पिटलला पाच बेडची परवानगी होती परंतु त्यांनी 10 पेक्षा जास्त बेड्स बसवल्या होत्या. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी अग्निशमन यंत्रणाही नव्हती. त्यामुळे एफआयआरमध्ये आयपीसीची कलम 304 आणि 308 जोडण्यात आली आहे. या अग्निकांडात 7 निष्पाप नवजात मुलांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.