गुरमित राम रहीम सिंह यांच्या अनुयायांची गुंडगिरी

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (17:29 IST)

डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंह यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर काही भागात हिंसेच्या घटना घडल्या आहेत. पंचकुलामध्ये पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. डेरा सच्चा समर्थकांची अनेक ठिकाणी जाळपोळ करत अनुयायांनी  गुंडगिरी दाखवत आहे. काही ठिकाणी  पोलिसांवर दगडफेक झाली आहे. तर  माध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. 

पंचकुलातील सीबीआय न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लष्करानं त्यांना ताब्यात घेतलं आहे. पंजाब, हरियाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या दोन्ही राज्यांना छावणीचे स्वरुप आलं आहे.

पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद केली आहे. चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी दिली आहे. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती