दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला ,काश्मीर फाइल्स वरील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

बुधवार, 30 मार्च 2022 (15:18 IST)
केजरीवाल सरकार काश्मीर फाइल्सवरून अमोर-समोर आहेत.  बुधवारी, खासदार तेजस्वी सूर्याच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली आणि त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. त्यानंतर आम आदमी पक्षचा भाजपवर हल्लाबोल झाला असून भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. 
 
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी ट्विट करून आरोप केला की, काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि तेथे बसवलेले बूम बॅरिअरही तोडले.
 
मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक आप नेत्यांनीही ट्विट करून संपूर्ण घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले आहे आणि पोलिसांच्या उपस्थितीत हे सर्व घडल्याचा दावा केला आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी लिहिले की, “दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून असामाजिक तत्वांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अडथळे तोडले आहेत. गेटवर लावलेले बूम बॅरिअरही तोडण्यात आले आहेत.
 
पुढच्या ट्विटमध्ये सिसोदिया यांनी भाजपवर आरोप करत लिहिले, भाजपचे गुंड सीएम केजरीवाल यांच्या घराची तोडफोड करत आहेत. भाजप पोलिसांनी त्याला रोखण्याऐवजी घराच्या या आणले.
 
या प्रकरणी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्विट केले की, 'भाजपने दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सुरक्षा अडथळे आणि बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. किती वाईट कृत्य आहे.'
 
काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला होता. ते म्हणाले की, एक चित्रपट दिग्दर्शक करोडोंची कमाई करत आहे आणि भाजपचे लोक पोस्टर लावत आहेत. प्रत्येकाला चित्रपट दाखवायचा असेल तर दिग्दर्शकाला तो यूट्यूबवर टाकायला सांगा, सर्वांना तो विनामूल्य पाहता येईल. करात सूट देण्याची गरज काय? त्यांच्या या विधानामुळे दिल्ली विधानसभेत संतापाची लाट उसळली आणि  त्यांचे भाषण पूर्ण संपेपर्यंत ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.त्याचा  वक्तव्याचा निषेध म्हणून हे करण्यात आले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती