हिंदू सेनेच्या चेतावणीनंतर शाहीनबाग परिसरात जमावबंदी; कलम 144 लागू

रविवार, 1 मार्च 2020 (17:17 IST)
दिल्ली मधील शाहीनबाग (Shaheen Bagh) परिसर हा मागील अडीच महिन्यांपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरुद्ध सुरु असणाऱ्या आंदोलनांमुळे मोठ्या चर्चेत आला आहे, 'CAA मागे घ्या' या मागणीसह अनेक मुस्लिम महिलांनी याठिकाणी रस्ता ब्लॉक करून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस दल संपूर्ण अपयशी ठरत आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 14 , 19 आणि 21 अंतर्गत तेथे सामान्य जनतेच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे त्यामुळे आता स्वतः राष्ट्रवाद्यांनी मिळून हा रस्ता मोकळा करण्यासाठी शाहीनबागेत यावे अशी चेतावणी काल हिंदू सेने Hindu Sena) कडून देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आज या दिल्ली पोलिसांकडून शाहीन बागेत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या सूचनेचे फलक शाहीनबागेत लावण्यात आले असून या सूचनेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
 
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी शाहीन बाग परिसराला बॅरिकेड्सनी वेढले आहे. इथे सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आल्याने आता इथे आंदोलन करण्यास किंवा चार पेक्षा अधिक व्यक्तींनी जमा होण्यास परवानगी नाही असेही पोलिसंनी स्पष्ट केले आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक करावी करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. 
 
दरम्यान या आठवड्यात दिल्ली अनेक हिंसक घटनांची साक्षी ठरली होती. उत्तर पूर्व दिल्ली मध्ये CAA, NRC वरून मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जात होती जयामध्ये गोळीबार, दगडफेक या मार्गांचा सुद्धा वापर केला गेला होतायामध्ये पोलीस, सरकारी अधिकारी यांच्यासहित अनेक नागरिकांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती