महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (09:40 IST)
राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे केवळ मुस्लीम समुदायालाच नव्हे, तर हिंदुंनासुद्धा नागरिकत्व सिद्ध करणे जड जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसीला विरोध दर्शविला आहे.
 
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून (एनआरसी) देशभर वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केले आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला मुरड घालावी लागत आहे, अशी टीका होत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीएए आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या मुलाखतीचा काही भाग  सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती