2 लाख किलो आणि 500 कोटी किमतीचा गांजा आंध्र प्रदेश सरकारने जाळला

रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (11:08 IST)
आंध्र प्रदेश पोलिसांनी शनिवारी  तब्बल 2 लाख किलो वजनाचा आणि 500 कोटी रुपये किंमतीचा गांजा जाळून टाकल्याचं समोर आलं आहे. अंमली पदार्थांबाबतची राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने 'मिशन परिवर्तन' ही मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी 2 लाख किलोचा गांजा जप्त केला. 
 
या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 8 हजार 500 एकरवर असलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई केली आहे.
 
एकूण 1 हजार 363 गुन्हे नोंद करण्यात आले असून 1 हजार 500 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 562 आरोपी हे इतर राज्यातले असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती