मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंदला बसपाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून काढून टाकले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रमुख रामदास आठवले यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांना त्यांच्या पक्षात समाविष्ट करण्याची ऑफर दिली आहे. ते म्हणाले, “जर आकाश आनंद हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय पुढे नेऊ इच्छित असतील तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील व्हावे... जर ते पक्षात सामील झाले तर उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अधिक बळकटी मिळेल.”