मिळालेल्या माहितीनुसार ग्रेटर नोएडाच्या सेक्टर पी४ मध्ये एका ३१ वर्षीय स्टेशन मास्टरची कार ३० फूट खोल नाल्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी घडली जेव्हा दिल्लीतील मांडवली येथील रहिवासी भरत सिंह ग्रेटर नोएडा येथे एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. स्थानिकांचा असा विश्वास आहे की सिंग यांच्या मोबाईल फोनवरील चुकीच्या नेव्हिगेशनमुळे त्यांची दिशाभूल झाली असावी, परंतु पोलिसांनी सांगितले की सिंग यांचा मोबाईल फोन अजून सापडलेला नसल्याने हा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. ही संपूर्ण घटना ग्रेटर नोएडाच्या बीटा २ परिसरातील पी३ सेक्टरजवळची आहे.