शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला. न्यायालयाने काही अटींसह त्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यावर ते तुरुंगातून बाहेर आले. त्या नंतर मुख्यमंत्री केजरीवाल आपल्या पत्नीसह दुपारी कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात पोहोचले आणि तेथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे खासदार संजय सिंह हेही मुख्यमंत्र्यांसोबत होते.
सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना सशर्त जामीन दिला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात जाऊ शकणार नाहीत. त्याच वेळी, आवश्यक असल्या शिवाय कोणत्याही सरकारी फाइलवर स्वाक्षरी करणार नाही. खटल्याबाबत कोणतेही सार्वजनिक विधान किंवा टीका करणार नाही. कोणत्याही साक्षीदाराशी बोलता येणार नाही. गरज असल्यास ट्रायल कोर्टात उपस्थित राहून तपास कार्यात सहभागी व्हावे लागणार अशा काही अटींसह सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.