Aero India Show : बंगळुरूमध्ये आशियातील सर्वात मोठा एअर शो सुरू झाला, संरक्षणमंत्र्यांसह तीन लष्कर प्रमुख उपस्थित

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (10:47 IST)
ANI
आजपासून बंगळुरूमध्ये आशियातील सर्वात मोठा एरो इंडिया शो सुरू झाला आहे. हा कार्यक्रम 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून या कार्यक्रमात भारताची ताकद दाखवण्यात येईल. या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह लष्कराच्या तिन्ही प्रमुखांचा समावेश आहे.
 
रैम्पेज एयर टू ग्राउंड क्षेपणास्त्राचे प्रदर्शन   
इस्राईलच्या एल्बिट सिस्टम्सने एअर इंडिया शोमध्ये आपली रैम्पेज एयर टू ग्राउंड मिसाईलचे प्रदर्शन केले.
 
तेजस फाइटरचा HAL ला करार
या कार्यक्रमादरम्यान हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला 83 एलसीए तेजस फाइटरसाठी कंत्राट देण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने हा करार एचएएलला दिला.
 

Karnataka: Three Mi-17 helicopters taking part in the flypast at the inauguration of the Aero India-2021 in Bengaluru. pic.twitter.com/L4GvIjpVjO

— ANI (@ANI) February 3, 2021

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती