Tirupati Laddu Case:तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात भेसळ,सीएम चंद्राबाबू नायडूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले- 'कोणालाही सोडणार नाही
जगप्रसिद्ध तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादात भेसळ झाल्याची पुष्टी झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोपींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. तिरुपती येथील प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात येतात. या लाडवाच्या प्रसादात लाडू बनवण्यासाठी बीफ फॅट, फिश ऑईल आणि पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचा दावा राज्यातील सत्ताधारी टीडीपीने केला आहे. मात्र, लॅबचा अहवालही आला असून, याला पुष्टी दिली आहे.
भगवान तिरुपती बालाजीचा प्रसिद्ध प्रसाद लाडू बनवण्यात भेसळ केल्याच्या मुद्द्यावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे वक्तव्यही समोर आले आहे. या गैरप्रकारात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी गुरुवारी कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला, ज्याने दिलेल्या तुपाच्या नमुन्यात “बीफ फॅट” असल्याची पुष्टी केली.अहवालात नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचाही दावा करण्यात आला आहे.