दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची मोठी घोषणा

बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (18:22 IST)
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून हरियाणात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्येही पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. आता काँग्रेसच्या या पराभवानंतर भारतीय आघाडीच्या पक्षांकडूनही या पक्षावर जोरदार निशाणा साधला जात आहे. 
 
आता आप पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला असून दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्ष एकटाच लढणार असल्याचं आपच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी म्हटलं आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला अतिआत्मविश्वासही म्हटले आहे

प्रियांका कक्कर म्हणाल्या, एका बाजूला अतिआत्मविश्वास असलेली काँग्रेस आहे तर दुसरीकडे अहंकारी भाजप आहे. आम्ही गेल्या 10 वर्षात दिल्लीत जे काही केले, त्या आधारावर आम्ही निवडणूक लढवू.
 
यानिकालावर अरविंद केजरीवाल म्हणाले, हरियाणा निवडणुकीचा निकाल एक मोठा धडा आहे. या पासून शिकवणी मिळते की कधीही अति आत्मविश्वास ठेवू नये.कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये, असे ते म्हणाले. प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक जागा अवघड असते.
दिल्लीत विधानसभा निवडणुका पुढील वर्षी 2025 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती