Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील किडवाई नगरमध्ये एका तरुणाने काळ्या जादूच्या नावाखाली १० कुत्र्यांना निर्घृणपणे ठार मारले. स्थानिक लोक उद्यानात बांधलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांना काही संशयास्पद स्थितीत कबरी बांधल्याचे दिसले, त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि ही बाब उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार तरुणाने तंत्र-मंत्राच्या नावाखाली या कुत्र्यांना मारले आणि खोलीच्या मागे पुरले. घटनेनंतर तिथे फुले, अगरबत्ती, बिस्किटे आणि पाणी ठेवण्यात आले. तसेच उद्यानातील मंदिराचे पुजारी यांनी सांगितले की, सकाळी उद्यानात उपस्थित असलेले ४ कुत्रे आणि त्यांची ६ पिल्लू बेपत्ता आहे. जेव्हा त्यांनी शोध सुरू केला तेव्हा त्यांना खोलीच्या मागील बाजूस तीन लहान कबरी आढळल्या. हे पाहून त्यांनी त्या तरुणाला विचारपूस केली आणि त्याने सांगितले की कोणीतरी कुत्र्यांना मारले आहे, म्हणून त्यांना पुरण्यात आले आहे. त्यावर फुले, अगरबत्ती, बिस्किटे आणि पाणी ठेवण्यात आले. त्या तरुणाने मंदिराचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटही फोडले होते, ज्यामुळे घटना अधिक संशयास्पद बनली.
पोलिसांनी तपास केला
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला, परंतु पोलिस येण्यापूर्वीच आरोपी तरुण पळून गेला होता. तपासादरम्यान, पोलिसांना कबरीजवळ रक्ताने माखलेली काठी सापडली, काळ्या जादूमुळे कुत्र्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणाले की, आरोपीचा शोध सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाईल.