तपासादरम्यान पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना अटक केली. बुधवारी रात्री रघुबीर नगर बी ब्लॉकमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची सूचना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना अटक केलीअसून चौकशीमधून समोर आले की, मृतव्यक्ती ज्या कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते, त्याच कारखान्यात एक अल्पवयीन आरोपी काम करत होता. या सुरक्षक रक्षकाने अल्पवयीन मुलीच्या वागणुकीची तक्रार कारखाना मालकाकडे केली होती. या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे अल्पवयीन मुलगा चांगलाच राग आला होता. बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने साथीदारांसह सुरक्षा रक्षकाची चाकूने वार करीत हत्या केली.