सध्या देशात महिलांवर आणि मुलींवर लैगिक अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणारे आणखी एक प्रकरण गुजरातमध्ये समोर आले आहे. वडोदरा येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केला. हा जघन्य गुन्हा अशा वेळी घडला आहे जेव्हा राज्यात नवरात्रीच्या दिवसात देवीची स्थापना करून पूजा केली जात आहे. 
	 
	सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या मित्राला भेटायला गेली होती. रात्री 11 वाजता दोघेही भायली परिसरातील सनसिटी सोसायटीजवळ निर्जनस्थळी बसले असताना दोन दुचाकीवरून 5 जण आले. पाचही  जण आधी आक्षेपार्ह बोलले, ज्याचा पीडितेने आणि तिच्या मित्राने विरोध केला.