ब्रेक फेल झाल्याने मिनी ट्रक गर्दीत शिरला, 13 भाविक जखमी

सोमवार, 27 डिसेंबर 2021 (09:08 IST)
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान डीजे वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने वाहन गर्दीत शिरल्याने 13 भाविक जखमी झाले. ही घटना साळसर येथे घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गंभीर जखमींमध्ये पवन हेमराज भोंगर (21) रा. जामगाव महाराष्ट्र, जय नंदू तुमराम (14) रा. नंदनवाडी पांडुर्णा आणि करण अंतराम सलामे (16) रा. पांडुर्णा यांचा समावेश आहे. अपघातानंतर संतप्त लोकांनी डीजेची तोडफोड केली. 
 यात्रेकरू हनुमान मंदिराच्या धार्मिक यात्रेत चालत जात होते. डीजे असलेला मिनी ट्रक भाविकांच्या गर्दीच्या मागे धावत होता. अचानक ब्रेक फेल झाल्याने मिनी ट्रकचे नियंत्रण सुटले आणि पुढे जाणाऱ्या भाविकांना चेंदरून ट्रक पुढे गेला . अचानक झालेल्या या अपघातामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. पदयात्रेत सहभागी भाविक जीव वाचवून इकडे तिकडे धावू लागले. या अपघातात तीन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. भाविकांनी कसा तरी मिनी ट्रक अडवला. जखमींना तातडीने सौसर रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्यांना नागपूरला रेफर केले.
एसडीओपी एसपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ही घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता घडली. एक मिनी ट्रक पुढे सरकताना आणि भाविकांना पायदळी तुडवत चेंगराचेंगरीचा व्हिडिओ समोर आला आहे. शनिवारचा दिवस असल्याने सायंकाळच्या सुमारास सौसर जाम सावळी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी पांढुर्णा येथून हजारो भाविक जाम सावली मंदिर परिसरात येत होते. घटनेच्या वेळी मिनी ट्रकच्या छतावर भाविक बसले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती