जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (अवतार 2) हा चित्रपट कालच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अवतारच्या पहिल्या भागा प्रमाणेच त्याचा दुसरा भागही चाहत्यांनी पसंत केला आहे, पण त्याच दरम्यान एक अतिशय आश्चर्यकारक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.
नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार,लक्ष्मीरेड्डी श्रीनू त्यांच्या भावा राजूसोबत अवतार 2 चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले असता. श्रीनू अचानक खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले . त्यांच्या लहान भावाने त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.