मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला आग, एका महिलेचा मृत्यू,अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी

शुक्रवार, 13 मे 2022 (22:11 IST)
पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनच्या 544 क्रमांकाच्या पिलर जवळील इमारतीला आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत. इमारतीत अनेक लोक अडकले होते, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मात्र, आगीत होरपळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून लोकांना वाचवण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस अधिकारी समीर शर्मा म्हणाले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की तीन मजली व्यावसायिक इमारतीचा वापर सामान्यत: कंपन्यांना कार्यालयासाठी जागा देण्यासाठी केला जात होता. सीसीटीव्ही कॅमेरा आणि राउटर निर्मिती कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आग लागली. कंपनीचा मालक पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती