Lucknow news : 6 महिन्यांच्या पुतणीवर अत्याचार

शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (17:05 IST)
Lucknow news उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये सहा महिन्यांच्या मुलीवर तिच्या सख्ख्या काकानी बलात्कार केला. ही घटना मुस्करा येथे घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मुलीला गंभीर अवस्थेत ओराई येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सख्ख्या काकानी अंगणात झोपलेल्या सहा महिन्यांच्या पुतणीवर बलात्कार केला. मुलगी घराच्या अंगणात खेळत असल्याचं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. त्यादरम्यान तिच्या 30 वर्षीय काकानी तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केलं.  
 
मुलीचा आरडाओरडा ऐकून आई घटनास्थळी पोहोचली तेव्हा आरोपी काका घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मुलीच्या आईने मुस्करा पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात नेलं. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उरई मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं. पोलिसांनी आरोपी काकाला पकडून त्याची चौकशी सुरू केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती