ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 5 मोठे दहशतवादी ठार, यादी जाहीर
शनिवार, 10 मे 2025 (16:47 IST)
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर ने पाकिस्तानवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कर आणि जैशचे 5 मोठे दहशतवादी ठार झाले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत:
मुदस्सर खादियान, खालिद, हाफिज जमील, युसूफ अझहर, मोहम्मद हसन खान हे ठार झाले आहे.
हे सर्व दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांचे जवळचे मानले जात होते आणि ते भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यात सहभागी होते. ते लाँचपॅड आणि प्रशिक्षण शिबिरे चालवून भारतात घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते.