मोफत साडी वाटप कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 4 महिलांचा मृत्यू

रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (11:28 IST)
तामिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यातील वन्नियंबडीजवळ चेंगराचेंगरीत चार वृद्ध महिलांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत. साडी वाटप कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'थायपुसम' उत्सवापूर्वी अय्यप्पन नावाच्या व्यक्तीने मोफत वाटलेल्या साड्या घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. दरम्यान ही घटना घडली.  पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
 
 थाईपुसम हा एक सण आहे जो हिंदू तमिळ समुदाय थाईच्या तमिळ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतो. या सणानिमित्त  एका व्यक्तीकडून मोफत साड्यांचे वाटप करण्यात येत होते. साड्या वाटण्यासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी जमली होती. ज्यामध्ये चेंगराचेंगरीत चार महिलांचा मृत्यू झाला. हा कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.  पोलिसांनी म्हटले प्रकरणाची चौकशी करत असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. 
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती