30 एसीच्या घरात राहत आहे केजरीवाल, बिल 1 लाखाच्या वर

मंगळवार, 30 जून 2015 (12:26 IST)
दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी घराच्या विजेचे बिल 91 हजार रुपयांचे आले आहे. अशी माहिती आरटीआयच्या माध्यमाने मिळाली आहे. हे बिल एप्रिल-मे महिन्याचे आहे.    
 
आरटीआय एक्टिविस्ट विवेक गर्ग यांनी दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांच्या घरी किती प्रमाणात विजेची खपत होते यासाठी एक  आरटीआय दाखल केली होती. या आरटीआयच्या उत्तरात त्यांना दोन बिल मिळाले ते फारच धक्कादायक होते.  
 
विवेक गर्ग यांनी दिल्ली सरकारच्या सामान्य प्राशासनिक विभागात आरटीआय दाखल करून केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स स्थित सरकारी घराच्या विजेच्या बिलाची माहिती मागितली होती.  
 
या आरटीआयच्या उत्तरात त्यांना दोन बिल मिळाले ज्यात एक 55,999 रुपये आणि दुसरा 65,780 रुपयांचा होते. हे आरटीआय आल्यानंतर विपक्षाने केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.   
 
बीजेपीचे प्रवक्ता जीवीएल नरसिंहा राव यांनी म्हटले की केजरीवाल यांची शिकवण फक्त दुसर्‍या नेत्यांसाठी आहे. त्यांच्या स्वत:साठी काही शिकवण आणि सल्ला नाही आहे.  
 
त्यांनी म्हटले की एकीकडे जनतेला वीज मिळत नाही आहे आणि दुसरीकडे केजरीवाल जनतेच्या पैशांनी वीज एंज्वॉय करत आहे.  
 
वकील व आरटीआय एक्टिविस्ट विवेक गर्ग म्हणाले की केजरीवाल जेव्हा त्यांचा उपचार करून परतले तेव्हा त्यांनी सांगितले होते की ते आता एसीचा वापर करणार नाही, पण त्यांच्या घरी 30-32 एसी आहे. 

वेबदुनिया वर वाचा