महाकुंभात 11 जणांना हृदयविकाराचा झटका

सोमवार, 13 जानेवारी 2025 (17:43 IST)
महाकुंभ 2025 सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी प्रयागराज येथे एक कोटीहून अधिक जणांनी गंगेत स्नान केले. कडाक्याच्या थंडीत स्नान करण्यासाठी आलेल्या 11 भाविकांना हृदयविकाराचा झटका आला. 

या पैकी जत्रा परिसरातील परेड ग्राउंडवर असलेल्या सेंट्रल रुग्णालयात 6 रुग्णांना तर सेक्टर 20 मधील सब सेंटर रुग्णालयात 5 रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यापैकी 9 जणांची प्रकृती ठीक आहे तर दोघांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. 

मध्यवर्ती रुग्णालयातील 10 बेड आयसीयू वॉर्ड हृदयविकाराच्या रुग्णांनी भरलेले होते. हवामानात बदल झाल्यामुळे हृदयविकराच्या झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. उघड्यावर स्नान करताना भाविकांना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. 

डॉक्टरांनी सांगितले आहे की, आरोग्याची काळजी घ्यावी आणि थंडी वाजल्यावर शेकोटीने हात पाय उष्ण ठेवावे. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. पाण्यात स्नान करताना एकदम डुबकी घेऊ नका. असं केल्यास शरीरातील तापमान झपाट्याने कमी होते. या मुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती