जम्मू काश्मीर मध्ये बस अपघात, दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी एक प्रवाशी बस खोल दरीत कोसळल्याने किमान 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस जेके02-0445 लोरान ते पूंछच्या दिशेने जात होती. बसमध्ये 19 जण प्रवास करत होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित सर्व जखमींना उपचारासाठी मंडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही तरी संतुलन बिघडल्याने बस खोल दरीत कोसळली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 
मृतकांमध्ये चौकीदार वली मोहम्मद पिता कादिर शेख (70, बड़ाचर, लोरन), गुलाम मोहम्मद पिता नूर मोहम्मद (55, चेकरीबन, लोरन), परवीन अख्तर पत्नी मोहम्मद रशीद (32, लोरन), बशीर अहमद (लोरन), अजीज अहमद पिता मोहम्मद रमजान (65, लोरन), तसेच 4 वर्ष आणि 8 महिन्याचे मूल देखील सामील आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती