'जनलोकपाल मंजूर झाले नाही तर राजीनामा'

WD
दिल्ली सरकारने मंजूर केलेल्या जनलोकपाल विधेयकाला केंद्राने मंजुरी दिली झाली नाही तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी जाहीर घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. यामुळे काँग्रेस आणि भाजपचीही चांगलीच गोची झाली आहे.

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत एका घटनाबाह्य लोकपाल विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे नेते मुकेश शर्मा यांनी म्हटले आहे. तर भाजपचे जगदीश मुखी यांनी केजरीवाल सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, लोकपालला मंजुरी दिलेली असताना नवे विधेयक मांडून केजरीवाल काय साध्य करू पाहत आहेत?

दिल्लीच्या जनलोकपाल विधेयकाला अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिल्याचे समजते आहे. केजरीवाल यांनी नुकतीच दिल्लीत अण्णांची भेट घेतली. यात अण्णांनी पाठिंबा दिल्याचे समजते.

वेबदुनिया वर वाचा