पाकडे मुसलमान, दळभद्री मुस्लिम लीग, ओवेसीची ‘एमआयएम’ आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक ‘सामना’ जाळून स्वत:ची सुंता करून घेत होते, पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही याच सुंतावाल्यांच्या दाढीत बोटे फिरवीत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे.
मुंबईतील काही फडतूस लोक शिवसेनेस आव्हान देण्याच्या फुसकुल्या सोडून स्वत:च्याच अंतर्वस्त्रांना आगी लावत आहेत अशी बोच-या शब्दात भाजपवर टीका करण्यात आली आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी काही घेणेदेणे नसणारेच ‘सामना’ जाळण्याच्या हिरव्या पिचकार्या उडवू शकतात. ‘सामना’ जाळणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला चूड लावणे होय. ‘सामना’ जाळण्याची भाषा करणे म्हणजे मोदींच्या मूळ विचारसरणीची कत्तल करणे होय.