‘राजीनामा बॉम्ब’ने सेन्सॉर बोर्ड हादरले

शनिवार, 17 जानेवारी 2015 (11:53 IST)
‘मेसेंजर ऑफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला एफसीएटीने मंजुरी दिल्यामुळे नाराज झालेल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन व इरा भास्कर यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच बोर्डाच्या ७ सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. ‘राजीनामा बॉम्ब’ पडल्याने बोर्ड चांगलेच हादरले आहे.
 
डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मनाई केली होती. त्यानंतर चित्रपट प्रमाणीकरण अ‍ॅपिलेट लवादाने (एफसीएटी) या चित्रपटास मंजुरी दिल्यानंतर सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.
 
सेन्सॉर बोर्डात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेले सदस्य आणि अधिकारी संगनमत करीत भ्रष्टाचारात गुंतले असून ते कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आज सकाळी बोर्डाच्या इतर सदस्यांनी सामूहिक राजीनामा देत सॅमसन यांना पाठिंबा दर्शविला आहे.

वेबदुनिया वर वाचा