‘पृथ्वी २’ यशस्वी झेपावले

शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (18:34 IST)
‘पृथ्वी २’ हे मध्यम पल्याच्या जमिनीवरून मारा करणार्‍या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आर्ट गायडन्स पद्धतीनुसार या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. या क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूक वेळेत साधत आपली क्षमता सिद्ध केली. या मोहिमेमध्ये उपयुक्तसर्व रडार यंत्रणा, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्रणा, टेलीमेट्री स्टेशन्स आदी उपकरणाचा प्रक्षेपण मोहिमेदरम्यान वापर करण्यात आला. या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० किलोमीटर आहे, तर ते एक हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.  

वेबदुनिया वर वाचा