‘निर्भया’च्या माहितीपटामुळे गदारोळ

गुरूवार, 5 मार्च 2015 (19:23 IST)
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील माहितीपटामुळे नव्या वादास तोंड फुटले आहे. माहितीपटामध्ये बीबीसीच्या प्रतिनिधीने या प्रकरणातील आरोपीची थेट तिहार तुरुंगात जाऊन मुलाखत घेतली आहे. यावरुन संसदेत गदारोळ झाला. 
 
दरम्यान, आरोपीची मुलाखत असलेल्या माहितीपटाच्या चित्रीकरणास कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिले आहे. 
 
मुळात तिहार तुरुंगात आरोपीच्या मुलाखतीची परवानगी देण्यात कशी आली, याबाबत चौकशी करणार असून दोषींवर कठोर कारवाई करणार आहे, त्याचबरोबर हा वादग्रस्त माहितीपट भारतात प्रसारित होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा