‘घरवापसी’ केलेल्यांना आरक्षण

शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (10:24 IST)
ख्रिश्चन धमार्तून पुन्हा हिंदू धर्मात आलेल्या  दलित नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
 
हिंदु धर्मातून धर्मातर केलेल्या मागासवगीर्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही मात्र, त्यांनी पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला असल्याच त्यांना हा लाभ मिळू शकतो, असे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर, मंडल व चिनप्पा आयोगाच्या लिखाणाच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
 
दरम्यान, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सबंधित व्यक्तीने हिंदू धर्माचा पुन्हा स्वीकार केलेला असावा आणि  मूळ जात मागासवर्गीय असल्याचे त्याने सिद्ध केले पाहिजे. 
 

वेबदुनिया वर वाचा