‘खुनी पंजा’वरून काँग्रेसची मोदींविरुद्ध आयोगाकडे तक्रार

WD
‘खुनी पंजा’ असा शब्दप्रयोग करत काँग्रेसवर टीका केल्याबद्दल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ मुझफ्फरनगरमधील दंगल पीडितांच्या संपर्कात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे काँग्रेसविरोधात तक्रार केली होती. काँग्रेसनेही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे.

मोदींनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचा (पंजा) संदर्भ देत जहाल, उतावीळ व बदनामीकारक वक्तव्य केले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याशी संपर्क करून त्यांनी वरील तक्रार केली आहे.

खुनी पंजा हे उदगार अत्यंत खेदजनक असून, काँग्रेसविरुद्ध जनतेत दहशत माजविण्यात हा प्रकार आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा