‘इसिस’ची साक्षी महाराजांना धमकी

सोमवार, 28 डिसेंबर 2015 (10:44 IST)
नवी दिल्ली- इसिसने भाजपचे मेरठचे आमदार संगीत सोम यांच्यापाठोपाठ आता खासदार साक्षी महाराज यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. साक्षी महाराज यांनी या प्रकरणी उन्नाव जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.

धमकीचा फोन एका खासगी क्रमांकावरून आला असल्याची माहिती साक्षी महाराज यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत दिली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने तपासकार्य हाती घेतले आहे.

वेबदुनिया वर वाचा