हेडली ओकतोय अमेरिकेला न दिलेली माहिती

मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (11:03 IST)
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेला न दिलेली माहिती डेव्हिड हेडली न्यायालयासमोर देत असल्याची माहिती  सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली.

माफीचा साक्षीदार झालेल्या हेडलीची साक्ष आज सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेतली असून आत्ताशी केवळ २५ टक्केच प्रश्न विचारून झाल्याचे निकम म्हणाले. उद्या पुन्हा साक्ष नोंदवण्यात येणार असून अमेरिकेला न दिलेली माहिती हेडली भारताशी बोलताना उघड करेल अशी आशा निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा