'हुदहुद'मुळे सात जणांचा मृत्यु, विशाखापट्टणला जाणार मोदी!

सोमवार, 13 ऑक्टोबर 2014 (15:45 IST)
‘हुडहुड‘ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाने सात जणांचा बळी घेतला आहे. सोमवारी मदतकार्याला वेग आला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवारी) विशाखापट्टणमला भेट देणार असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
 
हुदहुद चक्रीवादळ रविवारी (12 ऑक्टोबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास विशाखापट्टणम किनार्‍यावर धडकले. त्यानंतर अल्पावधीतच आंध्र प्रदेशमध्ये हे वादळ सक्रिय झाले. ताशी 180 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने हे वादळ आंध्रच्या किनाऱ्यावर थडकल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
आंध्र आणि ओडिशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणखी तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्रातील विशाखापट्टणम आणि श्रीकाकुलम या जिल्ह्यांत एकूण पाच जणांचा मृत्यु झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा