हनुमंतप्पा यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (10:33 IST)
वीर जवान हनुमंतप्पा यांच्या पार्थिवावर आज  बेटदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कर्नाटक इंस्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स या संस्थेच्या इमारतीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. आज सकाळी नेहरू स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले आहे. त्यानंतर हनुमंतप्पा यांच्या बेटदूर या मूळ गावी त्यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा