सोनिया गांधीचे नटवर सिंह यांना प्रत्युत्तर

गुरूवार, 31 जुलै 2014 (18:02 IST)
कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले  माजी खासदार नटवर सिंह यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत आपल्या आत्मकथना उल्लेख करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. नटवर सिंह यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, 2004 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान बनण्यास राहुल गांधी यांनी विरोध केला होता. राहुल गांधी यांना भ‍िती होती की, सोनिया गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचीही हत्या केली जाईल. 
 
नटवर सिंह यांच्या खुलाशावर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी जेव्हा पुस्तक लिहिन तेव्हा सत्य बाहेर येईल, अशा शब्दात सोनियांनी नटवकर  सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने नटवर सिंह यांना पाठिंबा दिला आहे. नटवर सिंह यांचा दाव्यात तथ्य असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे. 
 
नटवर सिंह यांनी चर्चेत राहण्यासाठी असा खुलासा केल्याचे अजय माकन यांनी म्हटले आहे. उलटसूलट वक्तव्य करण्याची राजकारणात नवा ट्रेंड आल्याचे माकन यांनी सांगितले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा