सेल्फी थांबवतोय मुलींची छेड

शनिवार, 17 सप्टेंबर 2016 (11:36 IST)
हो हे खर आहे. एक सेल्फी मुलीची छेद थांबवत आहे. हे घडले आहे मध्यप्रदेश येथील भोपाळ येथे. अनेकदा सेल्फी घेत असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 
मात्र जर सेल्फी छेदछाडी पासून मुलीना वाचवत आहे. राज्यातील तरुणींवर होणारे अत्याचार कमी करण्याची उपाय योजना म्हणून मध्य प्रदेश पोलिसांनी नवीन शक्कल लढवली आहे. मध्य प्रदेशातील पोलिसांनी तरुणींना संरक्षणाची हमी देण्यासाठी ‘इंस्पेकटर माझा भाऊ’ हा नवा उपक्रम सुरु केला आहे. 
 
पोलिसांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणी या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत. पोलिसांच्या या उपक्रमामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर आळा बसायला मदत होईल. तसेच इतर ठिकाणी वावरताना देखील तरुणीकडे पाहण्याचाच टवाळखोरांचा दृष्टिकोन बदलू शकतो, असा मध्य प्रदेश पोलिसांचा कयास आहे.
 
होसिंगाबाद येथील एस पी ए पी सिह सांगतात की मुलीची ऑनलाईन छेड सुरु असते मात्र पोलिस अधिकारी सोबत दिसले की छेड काढणार दोन वेळा तरी विचार करेल असा आम्हाला विश्वास आहे. तर त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वेबदुनिया वर वाचा