सलमानला तात्पुरते हुशऽऽऽऽऽऽ

गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (13:08 IST)
काळविटांच्या शिकारप्रश्नी खटल्याची सुनावणी जोधपूर न्यायालयाने ३ मार्चपर्यंत लांबणीवर टाकल्याने अभिनेता सलमान खानला तात्पुरता दिलासा मिळाला आहे़ या खटल्याची अंतिम सुनाववणी होणार होती मात्र, याचबाबत अद्यापी ४ याचिका प्रलंबित असल्याने ही सुनावणी ३ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.
 
प्रकृती बरी नसल्याचे न्यायालयास सांगून सलमानने आजच्या सुनावणीवेळीही अनुपस्थिती लावली. याबाबतचा अर्ज त्याच्या वकिलांनी न्यायालयात दिल्याने त्याला मुभा मिळाली.

वेबदुनिया वर वाचा