सध्या भारतात येत नाहीये झाकीर नाईक

मुंबई- इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आणि वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक हे एनआयए रडारवर आल्याने त्यांनी भारतात येण्याचे टाळले. ते सध्या सौदी अरबमध्ये आहेत. ते भारतात परतल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष असल्यामुळे त्यांनी सध्या येण्याचे टाळले आहे.
 
बांगलादेशातील ढाका येथे दहशतवाद्यांनी एका भारतीय युवतीसह 20 जणांची हत्या केली होती. या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी डॉ. नाईक यांचे नाव घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन आपण दहशतवादी बनलो. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, असे सांगितल्याचे उघड झाल्याने ते चर्चेत आले आहेत. 
 
ते मुस्लिम तरुणांना दहशतवादी बना, असा संदेश देत असतात. त्यांच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी यापूर्वी अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र डॉ. नाईक यांनी हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. 
 
नाईकप्रकरणी केंद्र सरकारने आक्रमक पवित्रा घेतला असून खुद्द गृहमंत्री राजनाथसिंह यांनी, योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. शिवसेनेने डॉ. नाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा