संसदेचे हिवाळी अधिवेशन 24 नोव्हेंबरपासून

मंगळवार, 28 ऑक्टोबर 2014 (14:27 IST)
संसदेचे हिवाळी अधिवेशन 24 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
 
संसदेच्या कामकाज मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ समितीने गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सुपुर्द केला आहे. सुमारे महिनाभर चालणार्‍या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. 
 
एका वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेत 59 आणि लोकसभेत आठ विधेयके प्रलंबित आहेत. केंद्र सरकारकडून यापैकी 30 ते 35 विधेयके सभागृहात मांडली जाण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा