नवी दिल्ली- देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, परकीय गुंतवणूक धोरणामध्ये बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठकीमध्ये नव्या धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
परकीय गुंतवणुकीचे धोरणअधिक सुटसुटीत आणि मुक्त करण्यात आले असून, भारतात गुंतवणूक करू इच्छिणार्यांसाठी त्याचा फायदा होईल, असे केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिकाधिक परकीय गुंतवणूक झाल्यामुळे विकासाला आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.